राष्ट्रकूल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला विजेतेपद

 नायजेरियातील लागोस इथं चार दिवस झालेल्या राष्ट्रकूल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील ‘ आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटांत भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भारताच्या वरिष्ठ तलवारबाजांनी सहापैकी 5 सुवर्णपदकं पटकावली.