August 14, 2026 10:17 AM

views 52

राष्ट्रकूल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला विजेतेपद

 नायजेरियातील लागोस इथं चार दिवस झालेल्या राष्ट्रकूल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील ' आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटांत भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भारताच्या वरिष्ठ तलवारबाजांनी सहापैकी 5 सुवर्णपदकं पटकावली.