कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अति जोरदारपाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगढला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे.
तसंच गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, आणि उत्तराखंड मध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.