जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
टोकियोजवळच्या चिबा प्रांताला आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.