महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंशामुळे झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या मृत्युप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे.
या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला.
तीन जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत.