August 14, 2026 9:30 PM

printer

सावरकर वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या  मानहानीकारक वक्तव्यांप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयाने बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले.

 

उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. न्यायालयानं खंडपीठाने तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला.  महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.