राष्ट्रीय

July 1, 2025 8:42 PM

views 33

केंद्र सरकारकडून रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या सवलत योजनेची घोषणा

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रोजगाराशी संलग्न सवलत योजनेला मंजुरी दिली. या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल. १ कोटी ९२ लाख युवकांना याचा लाभ मिळेल, अशी आशा माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती देताना व्यक्त केली.  त्यांना कामावर ठेवणाऱ्या कंप...

July 1, 2025 8:38 PM

views 42

डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशानं नव्या युगात प्रवेश केल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

 डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं, या उद्देशानं २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केलं होतं. यासंदर्भात समाजमाध्यमावर जारी केलेल्या संदेशात प्रधानमंत्री ...

July 1, 2025 8:39 PM

views 20

‘रेलवन अ‍ॅप’चं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘रेलवन अ‍ॅप’चं उद्घाटन केलं. अनारक्षित तिकीट काढणं, रेल्वेगाड्यांची चौकशी, प्रवास नियोजन, मदत सेवा आणि खानपान सेवा या सेवा या अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमच्या स्थापना दिनानिम...

July 1, 2025 2:39 PM

views 19

वेव्हएक्स स्टार्टअप चॅलेंज २०२५ ची सुरूवात

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटर उपक्रम वेव्हएक्स अंतर्गत वेव्हएक्स स्टार्टअप चॅलेंज २०२५ ची सुरूवात केली आहे. देशभरातल्या स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बहुभाषिक भाषांतर प्रणाली विकसित करण्यासाठी या राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात.   'भाषासेतु - आजच्य...

July 1, 2025 1:32 PM

views 13

तेलंगणा औषधनिर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटात मृतांची संख्या ३५ वर

तेलंगणातल्या संगारेड्डी जिल्ह्यात पाशमाइलाटम या औषधनिर्माण कारखान्यात काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या ३५ झाली आहे. मृतांपैकी ११ जणांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारखान्यातील ढिगाऱ्याखाली आणखी १६ कामगार अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  NDRF आणि SDRF पथके दिवसरात्र काम करत आहेत.  &...

July 1, 2025 1:28 PM

views 21

देशभरात आज डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिवस साजरा केला जात आहे

देशभरात आज डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिवस साजरा केला जात आहे. दोन महत्त्वांच्या सेवांच्या योगदानाचा सन्मान करणं हा यामागचा उद्देश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तं सर्व डॉक्टर्स आणि सनदी लेखापालांंचं अभिनंदन केलं आहे. भारताची आरोग्यसेवा मजबूत करण्यात डॉक्टरांचे योगदान खरोखरच असाधारण असल्...

July 1, 2025 1:18 PM

views 47

पहिल्या महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज पहिल्या महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचं गोरखपूरमध्ये लोकार्पण झालं. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या विद्यापीठाची पायाभरणी २८ ऑगस्ट २०२१ ला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोवि...

July 1, 2025 1:01 PM

views 25

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्ष पूर्ण

वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्षं पूर्ण झाली. आर्थिक एकात्मता आणि कर सुधारणांच्या दिशेनं एक मोठा बदल म्हणून २०१७ मध्ये GST प्रणाली लागू करण्यात आली. त्यामुळे भारतातील अप्रत्यक्ष करांची मालिका एकात्मिक प्रणालीत रूपांतरित झाली. जीएसटीने कर अनुपालन सोपे केले असून व्यवसायांसाठी खर्च कमी केला आहे. ...

July 1, 2025 12:44 PM

views 60

राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच जाहीर केलं जाणार- अमित शहा

 देशातल्या सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देशातल्या सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.   रा...

July 1, 2025 12:33 PM

views 43

व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मुंबईत ५८ रुपयांनी किंमत कमी झाली असून आता ती १ हजार ६६५ रुपये झाली आहे.   दरम्यान, नवी दिल्लीत व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत ५८ रुपये ५० पैशांनी, कोलकातामध्ये ५७ रुपये आणि चेन्नईमध्ये ५७ रुपये ५० पैशांनी घट झाली आहे. घरगुती सिलिंडर...