August 11, 2026 10:52 AM

printer

कोलंबियात भूकंपामुळे 132 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, 570 जण जखमी

कोलंबियाच्या पश्चिम भागाला काल 7 पूर्णांक 4 दशांश रिख्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपात किमान 132 लोकांचा मृत्यू झाला असून, 570 जण जखमी झाले.  भूकंपामुळे शेकडो इमारतींचं नुकसान झालं असून, अद्याप  अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

 

या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बोगोटाच्या पश्चिमेला सुमारे 400 किलोमीटर अंतरावर होता.  कोलंबियाचे अध्यक्ष अबेलार्डो डे ला एस्प्रिएला यांनी देशभरात  आणीबाणी जाहीर केली आहे. इक्वेडोर आणि पनामा या शेजारील देशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले.