अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास गृहमंत्री अमित शाह यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल, असं रिजिजू म्हणाले.