August 11, 2026 11:25 AM

printer

कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी वितरित

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी काल वितरित केला. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजे एनएसपीच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे.

 

या प्रसंगी बोलताना चौहान म्हणाले, की या शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नसून कृषी शिक्षणाला बळकटी देण्याचा आणि त्याला व्यावहारिक शिक्षण आणि संधींची जोड देण्याचा तो महत्त्वाचा भाग आहे. एनएसपी आणि डीबीटी या दोन प्रणाली एकत्रित आल्यामुळे शिष्यवृत्तींच्या निधीचं वितरण पारदर्शी, जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.