August 1, 2026 3:45 PM

views 32

तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपान्त्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यु सुनचा २१-१२, २१-११ असा पराभ केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुय लिन एंगुयेन हिच्याशी पडेल.

August 1, 2026 3:44 PM

views 32

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १९२ रुपये कपात

तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १९२ रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २ हजार ७३८ रुपये, कोलकाता मध्ये २ हजार ८७२ रुपये, मुंबईत २ हजार ६९० रुपये तर  चेन्नईत २ ह...

August 1, 2026 3:44 PM

views 33

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन

आंध्रप्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपु राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.  ५ हजार कोटी रुपये खर्चू...

August 1, 2026 3:50 PM

views 43

केरळमध्ये मुसळधार पाऊस; १४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

केरळमध्ये पावसाची संततधार सुरु असून हवामान विभागानं राज्यातल्या १४ जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे.  केरळमध्ये कालपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर...

August 1, 2026 3:35 PM

views 43

देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी कोकण, गोवा, आणि केरळमध्ये  मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्...

August 1, 2026 3:30 PM

views 33

भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधील ‘नथू-ला’ खिंडीतून पुन्हा सुरू

भारत आणि चीन देशांमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधील 'नथू-ला' खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन शेजारी देशांमधील एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू असलेली सहा वर्षांची स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे स...

August 1, 2026 3:29 PM

views 40

देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून त्यांना योग्य मार्गावर आणलं पाहिजे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

August 1, 2026 3:29 PM

views 54

सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारण विधेयक २०२६ ला राष्ट्रपतीची मंजुरी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारण विधेयक 2026ला मंजुरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणे, हा या विधेयकाचा मुख्...

July 31, 2026 8:57 PM

views 20

पाकव्याप्त काश्मीरमधे पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून भारतानं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला.

पाकव्याप्त काश्मीरमधे पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमधे ४० हून...

July 31, 2026 8:59 PM

views 67

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमीपूजन

मुंबईत, घाटकोपर परिसरात 'लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था' आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं, स्वाभिमानाचं; तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत...