August 1, 2026 3:29 PM

printer

देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून त्यांना योग्य मार्गावर आणलं पाहिजे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून जारी केलेल्या ध्वनिचित्र संदेशात व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत जंतर-मंतर इथं अलीकडंच घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत मातेविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला राग आणि निराशा आपण समजू शकतो,मात्र या तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.