August 1, 2026 8:33 PM

printer

जैस्मीन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी ३ सुवर्ण पदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या ५४ किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मीन लंबोरिया हिनं ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्यपदक पटकावलं. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंह यानं रौप्यपदकावर नाव कोरलं. तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्यपदक जिंकलं. 

 

स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या ८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ७ कास्यपदकांसह एकंदर ३० पदकं मिळवून 6 व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदकविजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.