मुंबईत, घाटकोपर परिसरात ‘लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं, स्वाभिमानाचं; तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै २०२९ पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, असं त्यांनी सांगितलं.
पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतिवर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचेही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.