केरळमध्ये पावसाची संततधार सुरु असून हवामान विभागानं राज्यातल्या १४ जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. केरळमध्ये कालपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे तर काही भागात भूस्खलन झालं असून कोट्टायम जिल्ह्यातल्या इरातूपट्टा शहराचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनानं मंगलम, नेय्यार आणि अरुविक्कारा धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये समुद्रात गेलेल्या दोन नौका बुडाल्यानं चार मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.
News On AIR | August 1, 2026 1:19 PM
केरळमध्ये मुसळधार पाऊस; १४ जिल्ह्यांना रेड अलर्ट