August 1, 2026 1:00 PM

printer

देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी कोकण, गोवा, आणि केरळमध्ये  मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणाचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत.