August 1, 2026 12:56 PM

printer

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत जूडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत जूडोमध्ये प्रथमच भारताने सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पदकं पटकावली तर यामिनी मौऱ्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कास्य पदक पटकावलं. आतापर्यंत पाच सुवर्ण, बारा रौप्य आणि सहा कास्य पदकांची कमाई करत भारत २३ पदकांसह पदकतालिकेत १० व्या स्थानावर आहे.