भारत आणि चीन देशांमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधील ‘नथू-ला’ खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन शेजारी देशांमधील एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू असलेली सहा वर्षांची स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे सीमापार वाणिज्यिक व्यवहारांना चालना मिळण्याची आणि नोंदणीकृत व्यापारी, वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांना लाभ होणार आहे. चार दशकांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर, नथू-ला मार्गावरील व्यापार यापूर्वी 2006 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला होता.
News On AIR | August 1, 2026 12:18 PM
भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधील ‘नथू-ला’ खिंडीतून पुन्हा सुरू