August 1, 2026 1:24 PM

printer

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन

आंध्रप्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपु राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 

५ हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरुन येत्या १७ ऑगस्टपासून विमानवाहतूक सुरु होईल. 

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. 

कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.  आंध्रप्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा  नृत्य यावेळी  सादर करण्यात आलं. विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या.

आंध्रप्रदेशचा दौरा आटोपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत.