लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांनाही आदरांजली वाहण्यात येत आहे.