तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १९२ रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत.
यानुसार दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २ हजार ७३८ रुपये, कोलकाता मध्ये २ हजार ८७२ रुपये, मुंबईत २ हजार ६९० रुपये तर चेन्नईत २ हजार ९०६ रुपये इतकी झाली आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
५ किलो वजनाच्या छोटू सिलिंडरचे दरही ८०८ रुपये ५० वरुन कमीकरुन प्रतिसिलिंडर ७६२ रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रतिलीटर ११५ रुपये केले आहेत.