प्रादेशिक बातम्या

April 17, 2025 3:33 PM

views 38

अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून आनंद व्यक्त

अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती - मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की, या विमानतळामुळे य...

April 17, 2025 3:38 PM

views 30

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उद्या छत्रपती संभाजीनगरचा दौरा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता विशेष विमानाने ते शहरात पोहोचतील, सिडको परिसरातल्या कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते उद्योजकांशी ...

April 17, 2025 3:26 PM

views 44

राज्यात राबवण्यात येतोय जल व्यवस्थापन कृती पंधरवडा

राज्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून, याअंतर्गत येत्या २२ तारखेला उपसा सिंचनाच्या पाणी परवाना तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे. लाभक्षेत्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. न...

April 17, 2025 2:32 PM

views 156

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण बिर्ला यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासगाथेत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व...

April 17, 2025 11:15 AM

views 17

राज्यातील प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या ७५ टक्के लाभार्थ्यांना देण्यात आलाय ओळख क्रमांक

राज्यातल्या शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. राज्यातील प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या ७५ टक्के लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आल्याची माहिती पुणे भूमी अभिलेख संचालक ...

April 17, 2025 10:59 AM

views 43

उत्तम आरोग्यासाठी रोज केळी खाण्याचा आरोग्यतज्ञांचा सल्ला

अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातल्या रावेर इथं काल जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. केळ्यांमधल्या पोषणमूल्यांबाबत जागरूकता वाढून त्याचं सेवन वाढावं यासाठी केळी दिवस साजरा केला जातो... जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळ्यांचं उत्पादन भारतात होतं. मात्र भारतीयांमध्ये आवश...

April 17, 2025 10:51 AM

views 48

राज्यातल्या अनेक शहरांत कमाल तापमान चाळीशीपार

राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाच्या झळांमध्ये वाढ झाली असून अनेक ठिकाणी कमाल तापमानानं चाळीशी ओलांडली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोल्यात ४३ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मालेगांव, अहिल्यानगर, जळगांव तसंच मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठ...

April 17, 2025 10:48 AM

views 44

विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार – मुख्यमंत्री

शेतीविषयक विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. व...

April 17, 2025 10:44 AM

views 25

मध्य रेल्वेने मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेस गाडीत बसवलं एटीएम यंत्र

मध्य रेल्वेनं मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेस गाडीत एटीएम यंत्र बसवलं आहे. चालत्या रेल्वेत एटीएमची सुविधा देण्याचा रेल्वेचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या सुविधेच्या तांत्रिक व्यवहार्यतेचं मूल्यांकन केल्यानंतर इतर गाड्यांमध्येही ती बसवता येईल असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी आका...

April 17, 2025 10:43 AM

views 15

महिला बालविकास मंत्रालयाच्या वतीने देशात राबवण्यात येतोय ७वा पोषण पंधरवडा

केंद्र सरकारच्या महिला बालविकास मंत्रालयाच्या वतीनं देशात ७वा पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेसंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे म्हणाल्या... स्थानिक पातळीवर कुपोषणाची समस्या ओळखून आणि शारीरिक दृष्ट्‍या सक्रिय व निरोगी राहण्यासाठी पालकांना वि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.