प्रादेशिक बातम्या

April 17, 2025 10:35 AM

views 67

अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार-मराठी भाषा मंत्र्यांची घोषणा

बीड इथं जिल्हा गुंतवणूक परिषद काल घेण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांनी ९०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यातून असंख्य रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. बीड इथं कौशल्य विकास केंद्र उभारण्य...

April 17, 2025 10:32 AM

views 56

राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन

राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या गठित करण्याचा निर्णय, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. या समित्या फडमालक आणि कलावंतांच्या समस्या समजून घेऊन, उपाययोजना सुचवतील, अशी माहिती त्यांनी दिली.

April 17, 2025 10:28 AM

views 60

या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी सीबीएसई आधारित अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश जारी

राज्यात सीबीएसईच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश काल जारी झाला. या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी, पुढच्या शैक्षणिक वर्षापासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी, २०२७-२८ पासून पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीसाठी, तर २०२८-२९ ला आठवी, दहावी आणि बारावीसाठी CBSE अभ्यासक्रमाची अंमलबजावणी क...

April 17, 2025 9:46 AM

views 80

महाराष्ट्रात अमरावतीमध्ये अग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था होणार सुरू

अमरावती इथं सुरू केली जाणारी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था अग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ करताना ते बो...

April 16, 2025 8:53 PM

views 56

आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली आहे. गवई सध्या सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना १३ मे रोजी सेवानिवृत्त होण...

April 16, 2025 8:46 PM

views 52

२४ कॅरेट सोन्याचे दर पहिल्यांदाच ९७ हजारांच्या पलीकडे, चांदी १ लाखाच्या उंबरठ्यावर

दररोज उच्चांकी पातळी गाठण्याची चढाओढ सोन्या-चांदीच्या दरात आजही कायम राहिली. त्यामुळं सोनं आणि चांदी आज सुमारे दीड हजार रुपयांनी महाग झालं. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोनं ९७ हजार ४१७ रुपये तोळा, २२ कॅरेट सोनं ९५ हजार रुपये तोळा, तर चांदी सुमारे ९९ हजार ५०० रुपये किलो दराने मिळत होती.    भार...

April 16, 2025 3:49 PM

views 48

नाशिक शहरात मध्यरात्री दगडफेक, २१ पोलीस जखमी

नाशिक शहरातल्या द्वारका परिसरात काल रात्री जमावानं दगडफेक केल्यामुळे २१ पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या तीन वाहनांचंही नुकसान झालं आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमाराला परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं. या परिसरात बेकायद...

April 16, 2025 9:34 AM

views 48

महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात मुंबईत सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कराराअं...

April 15, 2025 8:02 PM

views 83

नागपुरात २४ एप्रिलपासून १००व्या नाट्य संमेलनाचं आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनाअंतर्गत नागपूर विभागाचं नाट्य संमेलन येत्‍या, २४ एप्रिल ते २७ तारखेदरम्यान नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृहात केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्‍यक्ष प्रशांत दामले यांनी नागपुरात  वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    या संमेलना...

April 15, 2025 7:43 PM

views 47

Maharashtra : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

राज्यातला ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळप बंद केलं आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी ३१ मार्चअखेर साखरेचं उत्पादन ८० लाख २६ हजार टनपर्यंत पोहोचलं आहे, मागील हंगामाच्या तुलनेत या वर्षी साखरेचं उत्पादन सुमारे ३० लाख मेट्रिक टन कमी आहे. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार  राज्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.