प्रादेशिक बातम्या

April 15, 2025 7:35 PM

views 45

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या FRPबाबतचा निर्णय रद्द

राज्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या एफआरपीबाबत राज्यशासनानं २१ फेब्रुवारी २०२२ ला जारी केलेला शासननिर्णय रद्द केला आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. ऊसाच्या एफआरपीसंदर्भात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि इतरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं...

April 15, 2025 7:27 PM

views 12

दिव्यांग युवकांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

दिव्यांग युवकांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी तीन सामंजस्य करार झाले. यात श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, तसंच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला.

April 15, 2025 6:55 PM

views 210

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यातील महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता आणि नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्याच्या नियमांमध्ये एकवाक्यता आणण्यात आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याकरिता नवीन दरांबाबत अधिसूचना काढायला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक...

April 15, 2025 6:45 PM

views 52

यंदा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज

यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ५ टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूंजय मोहपात्रा यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत  ही माहिती दिली.    यावर्षी पाऊस सरासरीच्या  १०५ टक्के होण्याचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० या क...

April 15, 2025 6:37 PM

views 44

लातूरमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला सुरूवात

जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी या हेतूसाठी लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला आजपासून सुरूवात झाली. पाण्याची उपलब्धता आणि योग्य वापर याबाबत जनजागृती आवश्यक आहे. तसंच जलसंवर्धनाचं महत्व नागरिकांना समजून सांगण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर ...

April 15, 2025 3:53 PM

views 17

दिव्यांग युवांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी राज्यशासनाने केले तीन सामंजस्य करार

दिव्यांग युवांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी आज तीन सामंजस्य करार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. या करारा अंतर्गत प्रोजेक्ट मुंबई ही स्वयंसेवी संस्था दिव्यांग युवांना तांत्रिक...

April 15, 2025 3:33 PM

views 42

निलंबित आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलं संरक्षण

निलंबित आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्या निर्णयाविरोधात खेडकर हिने सर्वोच्च न्याया...

April 15, 2025 3:25 PM

views 108

राज्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना राबवण्यात येणार

राज्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्याकरता नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये आवश्यक सुधारणा करायला आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी...

April 15, 2025 2:56 PM

views 59

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचं निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचं काल नवी मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झालं. ते ८७वर्षांचे होते. राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी संघाचं त्यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केलं. त्यांनी स्थापन केलेली ही संघटना राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आपापली गाऱ्हाणी मांडण्याक...

April 15, 2025 2:52 PM

views 129

पंढरपूर ते लंडन अशा विठुरायाच्या दिंडीचं लंडनच्या दिशेने प्रस्थान

महाराष्ट्रातल्या संतांनी समाजाला दिलेला संदेश जगात सर्वदूर पोहोचावा, या उद्देशानं पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी काल रवाना झाली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाच्या प्रतिकात्मक पादुकांची विधिवत पूजा करून दिंडीनं लंडनच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. मूळचे अहिल्यानगरचे आणि लंडनमध्ये स्थायिक झाले...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.