राष्ट्रीय

December 6, 2024 1:41 PM

views 46

रेपो दर ६.५ टक्क्यावर कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीनं रेपो दरात काहीही बदल न करता तो साडे सहा टक्के कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. समितीनं हा दर कायम राखण्याची ही ११वी वेळ आहे. यामुळे स्थायी ठेव सुविधा दर सव्वा सहा टक्के तर सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर पावणे सात टक्के कायम राहणार आहे. रिजर्व्ह बँकेनं फेब...

December 6, 2024 1:55 PM

views 41

लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाचखोरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आज गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. सभागृहाचं कामकाज आता सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.    आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्र...

December 5, 2024 8:09 PM

views 23

ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्रा. सौमित्र दत्ता यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा

ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्राध्यापक सौमित्र दत्ता यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारतातल्या सुशासनाबद्दल प्रशंसा केली आहे. मोदींच्या नेतृत्वात देश जगातल्या प्रमुख आर्थिक शक्ती बनण्याकडे वेगानं वाटचाल करत असल्यामुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला असल्याचंही सौमित्र दत्ता यांनी प्रसारमा...

December 5, 2024 7:59 PM

views 49

भारताला फक्त इतर अर्थव्यवस्थांसाठी ग्राहक बाजारपेठ व्हायचं नाही – मंत्री डॉ. एस जयशंकर

भारताला फक्त इतर अर्थव्यवस्थांसाठी ग्राहक बाजारपेठ व्हायचं नाही असं आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज सांगितलं.  नवी दिल्लीत भारत ॲट 100 शिखरपरिषदेत ते बोलत होते. जागतिक कंपन्या आणि उद्योग भारतात फक्त भारतीय बाजारपेठेसाठी येत नाहीत तर तिथल्या गुणवत्तेसाठीही येतात असं ते म्हणाले. सूक...

December 5, 2024 7:36 PM

views 3

अरबी समुद्राच्या उत्तर भागात बुडणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाकडून सुटका

अरबी समुद्राच्या उत्तर भागात बुडणाऱ्या अल पिरानपीर या भारतीय जहाजावरच्या १२ कर्मचाऱ्यांची काल भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने सुटका केली. यंत्रचलित असलेलं हे जहाज गुजरातच्या पोरबंदर इथून निघालं होतं आणि ते इराणमध्ये बंदर अब्बास इथे जात होतं. काल सकाळी समुद्रातील खडकाळ पृष्ठभागाला धडकल्याने ते बुडायला ...

December 5, 2024 7:31 PM

views 8

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीसाठीच्या औद्योगिक सर्वेक्षणाचे निकाल घोषित

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज नवी दिल्लीत एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीसाठीच्या औद्योगिक सर्वेक्षणाचे निकाल घोषित केले.    या अहवालामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीविषयीची आकडेवारी समोर येते आणि त्याद्वारे मेक इन इंडियासारख्या उत्पादक प्रोत्साहन आणि कौशल्य विकास धोरण निर...

December 5, 2024 7:07 PM

views 30

इस्रोच्या पीएसएलव्ही सी ५९ यानाचं यशस्वी प्रक्षेपण

इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रोबा ३ उपग्रह घेऊन जाणाऱ्या पीएसएलव्ही सी ५९ प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आकाशात झेपावल्यावर  १८ मिनिटांनी  हे यान त्याच्या अपेक्षित कक्षेत पोहोचलं आणि  एकूण ५४५ किलो वजनाचे २ उपग्रह पृथ्वीपासून...

December 5, 2024 8:09 PM

views 51

राज्यसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ मंजूर

विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना देशाच्या आर्थिक, सामाजिक मूल्यांवर परदेशी संस्थांकडून दोषारोप होत असल्याचा मुद्दा राज्यसभेत शून्य प्रहरात भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी मांडला, त्यांना बोलण्यासाठी राज्यसभा अध्यक्ष जगदीश धनखड यांनी अधिक वेळ दिल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्षेप घेत गदा...

December 5, 2024 3:30 PM

views 40

शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी देशातल्या कृषिशास्त्रज्ञांनी नवीन योजना विकसित कराव्या – राष्ट्रपती

नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल तसंच नैसर्गिक स्रोतांचा गैरवापर या समस्यांपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी देशातल्या कृषिशास्त्रज्ञांनी नवीन योजना विकसित कराव्या, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज भुवनेश्वर इथे ओडिशा विद्यापीठाच्या ४० व्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. सुपीक जमी...

December 5, 2024 3:20 PM

views 63

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला. रांची इथं राजभवनात झालेल्या समारंभात झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंड मुक्ती मोर्चाचे ६, काँग्रेसचे चार तर राष्ट्रीय जनता दलाचा एक असे हे मंत्रिमंडळातले ११ मंत्री आहेत.