उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात काल संध्याकाळी एका जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माणाधीन असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून आणि पाणी झिरपून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 कामगार जखमी झाले आहेत.
या बोगद्यात 22 कामगार काम अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, राज्य आपत्ति प्रतिसाद दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह इतर यंत्रणा घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून सर्व यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले.