August 14, 2026 1:30 PM

printer

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासींयाना संबोधित करणार

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासीयांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल.

 

त्यामुळं आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज पावणे ७ वाजता प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल.