August 14, 2026 1:36 PM

printer

जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी

सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महा रजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहेत. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. 

गेल्यावेळेच्या जनगणनेत एकूण २९ प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते, यावेळी ही संख्या ४० झाली आहे.जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे.