प्रादेशिक बातम्या

September 30, 2024 9:06 PM

views 29

क्रूझ भारत अभियानाद्वारे पाच वर्षांत क्रूझवरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं लक्ष्य

क्रूझ भारत अभियानाद्वारे येत्या पाच वर्षांत जहाजावरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय असल्याची माहिती केंद्रीय बंदरं, वाहतूक आणि पर्यटन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. मुंबई इथं एम्प्रेस जहाजावर आज क्रूझ भारत अभियानाचा प्रारंभ सोनोवाल यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते...

September 30, 2024 7:47 PM

views 62

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा उदगीरमधे दाखल

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या पंचायत समितीच्या नव्या इमारतीचं तसंच तहसील आणि प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते आज उदगीर इथं आले होते. यानिमित्त आयोजित मेळाव्याला पवार यांनी संबोधित केलं. मेळाव्यानंतर ते पोलिस...

September 30, 2024 7:28 PM

views 31

काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून घेतल्या जाणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून घेतल्या जाणार आहेत. प्रदेश काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून १ हजार ६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्याच्या मुलाखतींसाठी काँग्रेसनं माजी मुख्यमं...

September 30, 2024 7:23 PM

views 20

समग्र आरोग्यसेवा मानकामुळे जागतिक चिकित्सा पर्यटनाच्या नकाशावर भारताला विशेष स्थान – केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

समग्र आरोग्यसेवा मानकामुळे जागतिक चिकित्सा पर्यटनाच्या नकाशावर भारताला विशेष स्थान मिळालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. मुंबईत आयुष वैद्यकीय पर्यटन परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. जगभरातून लाखो लोग आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी भारतात येतात. शरी...

September 30, 2024 12:50 PM

views 36

नेपाळमध्ये पावसाचा कहर, विविध घटनांमध्ये १३२ नागरिकांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने  कहर केला आहे.  पावसामुळे पूर आणि दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गीक संकटांमध्ये एकूण १३२ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती नेपाळ गृहमंत्रालयाने दिली आहे. पूरपरिस्थितीमुळे काठमांडू दरी भागात ६८जण, बागमतीमध्ये ४५ ,कोशीत सतराजण तर मधेश परगण्यात दोन जणांचा मृत्यू झाला. सैन्यदलाच्या म...

September 30, 2024 8:53 AM

views 12

राज्यात मविआचं सरकार येईल, वडेट्टीवारांचा दावा

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथं काँग्रेस मेळाव्यात ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या लडाकी बहिण योजनेवर टीका केली.

September 30, 2024 8:13 AM

views 63

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते

शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. वर्ष २०२० ते २०२२साठीच्या एकंदर ४४८ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महा...

September 29, 2024 5:13 PM

views 42

विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची १२ जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतले तीन प्रमुख पक्ष इतर समविचारी पक्षांचा विचार न करता आपसातच जागावाटपाची चर्चा करत असल्याची नाराजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी माकपनं केवळ १२ जागांची मागणी केला आहे. इतर पक्षांनीही मर्यादित जागांची मागणी केली आहे. प...

September 29, 2024 3:50 PM

views 21

शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण

शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्या अनुषंगानं, ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा प्रारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईच्या कुर्ला इंथल्या शा...

September 29, 2024 3:46 PM

views 40

साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामांचं भूमीपूजन

साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघातल्या विविध कामांचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई बहुद्देशिय कृषी संकुलाचं उद्घाटन  आणि  नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या पाणी योजनेचं भूमीपूजन याचा यात समावेश आहे. त्यानंतर नाडे इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.