प्रादेशिक बातम्या

October 1, 2024 7:30 PM

views 14

महाविकास आघाडीचं जागावाटप दसऱ्याला जाहीर होणार – जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडीचं जागावाटप दसऱ्याला जाहीर होणार आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक जागांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आता डावे पक्ष आणि इतर संघटनांसोबत चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले.

October 1, 2024 7:27 PM

views 71

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पुतळा उभारताना योग्य काळजी घेतली नाही. पुतळ्याच्या उभारणीतलं साहित्य निकृष्ट दर्जाचं होतं, असा सरकारी वकिलांचा युक्तीवाद जामीन फेटाळताना न्यायाल...

October 1, 2024 7:23 PM

views 50

मुंबईत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली वाडीबंदर कोचिंग डेपोची पाहणी

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वाडीबंदर कोचिंग डेपोची पाहणी केली. पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि डेपोच्या भविष्यातल्या विस्तार योजनांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. बेस्ट फ्रॉम वेस्ट या प्रदर्शनात त्यांनी कचरा संकलन विषयीच्या नव्या कल्पनांचं त्यांनी कौतुकही केलं. वंदे भारत...

October 1, 2024 8:39 PM

views 52

बदलापूर प्रकरण : संस्थेच्या विश्वस्तांना अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोन आरोपींना पोलिसांनी अद्याप पकडलं नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.  या प्रकरणी स्वतःहून दखल घेऊन चालवलेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या निष्क्रीयतेवर ताशेरे ओढले. या...

October 1, 2024 7:16 PM

views 50

एसटी महामंडळाच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ हे दवाखाने सुरू होणार

एसटी महामंडळाच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ हे दवाखाने सुरू होणार आहेत. याठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधं मिळणार आहेत. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.    प्रत्येक स्थ...

October 1, 2024 8:39 PM

views 24

लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या जमा झालेल्या रकमेतून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न इत्यादीसाठीचं शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सांगितलं. त्या आज मंत्रालयात या योजनेसंदर्भात आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्य...

October 1, 2024 7:01 PM

views 41

२०२३च्या खरीप हंगामातील उर्वरीत पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

राज्यात सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाई पोटी पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ६ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना १ हजार ९२७ कोटी रुपये लवकरच वितरीत होतील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय म...

October 1, 2024 6:56 PM

views 36

टेंभू विस्तारीत प्रकल्पातल्या सांगली जिल्ह्यातल्या तीन घटक कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

टेंभू विस्तारीत प्रकल्पातल्या, सांगली जिल्ह्यातल्या तीन घटक कामांचं भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं. या घटक कामांमध्ये टेंभू विस्तारीत प्रकल्पातल्या टप्पा क्रमांक ६, पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक ५ वितरण व्यवस्था, आणि कामथ गुरूत्व नलिका, यांचा समावेश आहे.    या कामा...

October 1, 2024 6:51 PM

views 42

राज्यातल्या ८ वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागाची मान्यता

राज्यातल्या एकूण आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहून राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागानं मान्यता दिली असून, याच सत्रापासून ही आठही महाविद्यालयं सुरू होणार आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.   या आठ वैद्यकीय महा...

October 1, 2024 6:47 PM

views 39

विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल – गृहमंत्री अमित शहा

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केला. मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं. कुठल्याही सर्व्हेचा विचार करू नका, महायुती पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना स...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.