प्रादेशिक बातम्या

October 2, 2024 7:33 PM

views 41

ओबीसी समाजाने साथ दिली तर वंचित बहुजन आघाडीला तीन आकडी जागा मिळतील -प्रकाश आंबेडकर

आगामी निवडणुकीत ओबीसी समाजाने साथ दिली तर वंचित बहुजन आघाडीला तीन आकडी जागा मिळतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते मनमाड इथं आदिवासी सत्ता संपादन परिषदेच्या वेळी बातमीदारांशी बोलत होते. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देऊ नये, या मागणीला...

October 2, 2024 7:27 PM

views 22

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात सांगितलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेतर्फे आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर महानगरपालिक...

October 2, 2024 7:03 PM

views 39

राज्यातल्या धर्मादाय कार्यालयाचं काम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

राज्यातल्या  धर्मादाय कार्यालयाचं काम कौतुकास्पद असून या विभागानं अधिकाधिक लोकाभिमुख कामं करावीत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली आणि रुग्णांकरता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचं  उद्घाटन आज फडनवी...

October 2, 2024 3:53 PM

views 26

ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर

यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक, आणि ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर झाली आहेत. यशवंतराव चव्हाण केंद्राच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. पाच ज्येष्ठ नागरिक आणि एका ज्येष्ठ न...

October 2, 2024 3:44 PM

views 31

वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर

दृष्यकलेच्या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना राज्यशासनातर्फे देण्यात येणारा वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना  जाहीर झाला आहे. सन २०२२-२३ साठीच्या  पुरस्कारासाठी शोधसमितीची बैठक उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. ...

October 2, 2024 2:33 PM

views 34

अक्षय शिंदेच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालचा हा एक सदस्यीय आयोग या प्रकरणातली पोलिसांची भूमिका, तसंच इतर संबंधित बाबींचा तपास करेल. अक्ष...

October 2, 2024 2:20 PM

views 36

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात सांगितलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेतर्फे आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर महानगरपालिक...

October 2, 2024 1:35 PM

views 33

पुण्यात बावधन इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू

पुण्यातल्या बावधन इथे आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. बावधन परिसरात आज सकाळी पावणे सात वाजता ही दुर्घटना घडली. परिसरातल्या घटनास्थळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसंच अग्निशमन दलाकडू...

October 1, 2024 8:32 PM

views 25

पूरग्रस्त १४ राज्यांना केंद्र सरकारकडून निधी जारी, महाराष्ट्राला सर्वाधिक १,४९२ कोटी रुपये मिळणार

पूरग्रस्त १४ राज्यांना ५ हजार ८५८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं आज जारी केला. त्यापैकी सर्वाधिक हिस्सा म्हणून महाराष्ट्राला १ हजार ४९२ कोटी रुपये मिळणार आहे. राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला केंद्र सरकारचा वाटा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला आगाऊ हप्ता म्हणून हा निधी दिला जातोय...

October 1, 2024 7:35 PM

views 63

संभाजीराजे छत्रपती यांची “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नव्या राजकीय पक्षाची घोषणा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी या पक्षाची अधिकृत नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पक्षाला 'सप्तकिरणांसह पेनाची निब' हे चिन्ह मिळालं आहे. संभाजीराजेंनी काही महिन्यांपूर्वी स्वराज्य संघटना स्थापन केली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.