प्रादेशिक बातम्या

October 21, 2024 4:21 PM

views 34

हिंगोली : दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दोन ठार, एक गंभीर जखमी

हिंगोली जिल्ह्यातल्या पुसेगाव इथे भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. गौतम धाबे आणि शेख सत्तार अशी मृतांची नावं आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या बबन धाबे यांना नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   दरम्यान, हिंगोलीत झालेल्या दुसऱ्या एका अ...

October 21, 2024 4:15 PM

views 71

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे शेतपीकांचं नुकसान

नाशिकमध्ये विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरची शेतातली पिकं जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे ७६ हजार ५८८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चांदवड, देवळा, कळवण, त्रंबक आणि बागलाणमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मका, कांदा भातपिकांचं तसंच द्राक्ष पिकांचं नुकसान झालं आहे.

October 21, 2024 3:57 PM

views 50

बविआ पालघर जिल्ह्यातल्या ६ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार

बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातल्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांनी केली आहे. विरार पश्चिम इथं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा काल आयोजित केला होता, यात ठाकुर यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळेल असा विश्वास व्यक्...

October 21, 2024 3:30 PM

views 33

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहाव्या आरोपीला अटक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहाव्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी नवी मुंबईतील एक भंगार व्यापारी असून मुख्य आरोपींना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

October 21, 2024 3:21 PM

views 45

पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात आग

पुण्यातल्या महात्मा फुले मंडई परिसरातल्या मेट्रोस्थानकात मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. मेट्रोस्थानकात तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरु असताना तिथे ठेवलेल्या फोमच्या साहित्याने पेट घेतला असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणीही जखमी झालं नाही. या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुणे...

October 21, 2024 9:19 AM

views 70

खरीप पीक विम्यासाठी ७६ लाख ३६ हजारहून अधिक दावे

राज्यात खरीप पीक विम्यासाठी ७६ लाख ३६ हजारहून अधिक दावे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दाखल केल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. याचे सर्वेक्षण सुरू असून नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती लवाटे यांनी दिली. दाखल दाव्यांपैकी ७६ लाख २० हजार २४४ दावे ऑ...

October 21, 2024 8:58 AM

views 66

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक नेत्यांचं पक्षांतर

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत. माजी आमदार कपिल पाटील यांनी काल दिल्लीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वाशिम जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. स...

October 21, 2024 8:35 AM

views 66

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं 99 उमेदवारांची आपली पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी मतदारसंघामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, तर बल्लारपूरमधून मंत्री सु...

October 20, 2024 7:02 PM

views 47

रत्नागिरी जिल्ह्यातल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेत सांगलीचा अमन तांबोळी विजेता

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज, रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये ते गावखडी या किनारी मार्गावर दुसरी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली होती.  स्पर्धेच्या खुल्या गटात सांगलीचा अमन तांबोळी विजेता ठरला. अमननं ४८ किलोमीटर अंतर एक तास १६ मिनिटांमध्ये पार  केलं. ५५ वर्षांवरच्या पुरुष गटात पुण्याचे प्...

October 20, 2024 7:16 PM

views 40

राज्यात परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान

राज्यात परतीच्या पावसानं जोर धरला असून अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालं आहे. अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबिनला त्याचा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी आणलं असलं तरी शेतात पडून असलेलं सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोऱ्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.