प्रादेशिक बातम्या

October 20, 2024 1:20 PM

views 70

दिवाळी आणि छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेकडून ५७० विशेष फेऱ्या

दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार ...

October 20, 2024 10:35 AM

views 53

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

October 20, 2024 8:50 AM

views 39

कॉर्पोरेट जगात पाऊल ठेवताना स्वतःला सिद्ध करा – मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

कॉर्पोरेट जगात पाऊल ठेवताना स्वतःला सिद्ध करा आणि आपल्या गुणांच्या आधारे कुटुंब तसंच संस्थेची प्रतिष्ठा वाढविण्याचं कार्य करा असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल पुण्यात विद्यार्थ्यांना केलं. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म...

October 19, 2024 8:19 PM

views 78

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं १६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात शहादा,  साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हदगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नडमधून, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.

October 19, 2024 7:47 PM

views 45

गव्हाच्या १३ नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरू

भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था कर्नाल यांनी आज केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या गव्हाच्या १३ नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरु केलं आहे. नवीन वाणांचं बियाणं घेण्यासाठी देशभरातल्या २२ हजार शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली होती. गव्हाचं नवीन वाण अधिक उत्पादन देण्याबरोबरच रोग प्रतिबंधक आहे. बार्ली ...

October 19, 2024 7:45 PM

views 34

नक्षलवादी चळवळीत सक्रीय एका दाम्पत्यानं पोलिसांपुढे आत्मसमर्पण

नक्षलवादी चळवळीत सक्रीय असणाऱ्या एका दाम्पत्यानं आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. असिन राजाराम कुमार आणि अंजू सुळ्या जाळे अशी या दोघांची नावं आहेत. असिन हा ओदिशातील नक्षल चळवळीच्या प्रेस टीममध्ये एरिया कमिटी मेंबर म्हणून काम करायचा तर अंजू ही याच दलममध्ये सदस्य होती. २०२२ पासून आतापर्यंत २९ ...

October 19, 2024 7:42 PM

views 13

ज्येष्ठ पत्रकार, लेखिका अनुराधा औरंगाबादकर यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार, प्रथितयश लेखिका अनुराधा औरंगाबादकर यांचं काल दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. अनुराधा औरंगाबादकर यांनी १९७० साली पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची ९० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत...

October 19, 2024 7:29 PM

views 42

पुढील काळात राज्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं – सु्प्रिया सुळे

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या वाईट स्थितीत असून पुढील काळात राज्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या.    राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली असूनही कोट्यवधींच्या जाहिरातींस...

October 20, 2024 8:03 AM

views 39

सरकार अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ – अखिलेश यादव

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ या सरकारवर आल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. धुळे शहर मतदारसंघातून इर्शाद जहागीरदार यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आयोजित सभेत ते आज बोलत होते. महायुतीचं सरकार हे धर्मा धर्मात तेढ निर्मा...

October 19, 2024 7:18 PM

views 42

काँग्रेसच्या निरीक्षकांची टिळक भवन इथं बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निरीक्षकांची बैठक टिळक भवन इथं झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, भुपेश बघेल, पृथ्वीराज चव्हाण, चरणजीत सिंग...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.