प्रादेशिक बातम्या

October 22, 2024 7:04 PM

views 61

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांची पक्षाला सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी माजी मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं.  

October 22, 2024 6:47 PM

views 85

काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल – बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीत आता अवघ्या काही जागांबाबत सहमती व्हायची आहे, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल, असंही ते म्हणाले.    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली य...

October 22, 2024 7:24 PM

views 48

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करायला आजपासून सुरुवात झाली. विविध ठिकाणी उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली.     अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्यात अपक्षांचे ६ अर्ज दाखल झाले. यात फलटण विधानसभा मतदारसंघासाठी दोन,  कोरेगाव मतदार संघासाठी दोन, कराड उ...

October 22, 2024 4:48 PM

views 73

नांदेड जिल्ह्यातल्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड शहर आणि परिसरात तसंच अर्धापूर, हदगाव या तालुक्यात आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातल्या सावरगाव या ...

October 22, 2024 3:57 PM

views 80

भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती नितेश राणे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. हे सगळं पक्षीय धोरण असल्याचं सांगून  महायुतीच्या फार्म्युल्यान...

October 22, 2024 3:53 PM

views 73

भाजपा नेते राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपा नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. महायुतीचं जागावाटप लवकरच जाहीर होईल आणि त्याची घोषणा होईल, असं ते म्हणाले. आमच्या पक्षाकडे पुरेशा जागा आहेत, त्यामुळं पक्ष सोडून जाणाऱ्यां...

October 22, 2024 6:29 PM

views 197

महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात

महाविकास आघाडीत आता अवघ्या काही जागांबाबत सहमती व्हायची आहे. उर्वरित जागांवर सहमती झाल्याचं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलंय. उर्वरित जागांविषयी चर्चा करण्यासाठी दुपारी साडे ३ वाजता पुन्हा बैठक होणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं....

October 22, 2024 3:43 PM

views 28

नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची भाजपला सोडचिठ्ठी

भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वाशी इथं पक्षाच्या निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जा...

October 22, 2024 3:06 PM

views 48

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय ...

October 22, 2024 11:36 AM

views 38

भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोला इथल्या विचार सभेत गोंधळ

भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांची काल अकोला इथं झालेली विचार सभा, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम-लोकशाही मंच द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू होताच, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.