प्रादेशिक बातम्या

October 24, 2024 3:37 PM

views 31

जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईत दीड कोटी ४५ लाख रोकड जप्त

जळगाव जिल्ह्यातल्या कसोदा गावाजवळ पोलिसांनी काल रात्री दीड कोटी ४५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस काल रात्री एरंडोल विधानसभा परिसरात गस्त घालत होते.  त्यावेळी एका कारची तपासणी केली असता त्यात हे पैसे आढळून आले. ही रक्कम कोणाची आहे याचा तपास पोलीस करत आहेत...

October 24, 2024 5:32 PM

views 34

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर

विधानसभा निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  पथकांमार्फतही येत्या  20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात येत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्यानं, बाजारपेठा, शैक्...

October 24, 2024 2:52 PM

views 61

पोर्श कार प्रकरण : अरुणकुमार सिंह यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

पुण्यात कल्याणीनगर इथं २ मोटारसायकल प्रवाशांना धडक देणाऱ्या पोर्श गाडीतल्या अरुणकुमार सिंह यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावला. घटनेनंतर मद्यपानाचे पुरावे लपवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलून तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपीच्या  रक्ताच्या नमुन्याची  ...

October 24, 2024 2:39 PM

views 41

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात  लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी काल चौकशीसाठी ताब्यात घे...

October 23, 2024 7:39 PM

views 103

राज्यात सोनं-चांदीच्या दरात वाढ

राज्यात तोळ्यामागे सोन्याचे दर तोळ्यामागे ८० हजारांच्या पुढे गेले असून चांदी किलोमागे १ लाख रुपये झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं-चांदी आज सुमारे ४००-५०० रुपयांनी महागलं. २४ कॅरेट सोनं जीएसटी शिवाय ७८ हजार ७०० रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे व्यवहार ७८ हजार ४०० रुपये दराने होत होते. चांदीचे व्यवहार ९...

October 23, 2024 7:29 PM

views 55

काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर सुलभा खोडके यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

October 23, 2024 7:21 PM

views 44

भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

माजी मंत्री, भाजपा नेते  लक्ष्मण ढोबळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. ढोबळे पक्षात आल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षबांधणीसाठी होईल, असं सुळे यावेळी म्हणाल्या. तर आपण अजित पवार यांच्याशी मतभेद...

October 23, 2024 7:34 PM

views 42

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे उमेदवार अर्ज भरत आहेत.    मुंबईत मागाठाणे आणि जोगेश्वरी पूर्व अशा दोनच मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल झाले.    परभणी विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी ४ विधानसभा मतदार संघात ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. &nbsp...

October 23, 2024 7:15 PM

views 65

विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार

राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूक लढणार असून पन्नासपेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉक्टर गंगाधर बनबरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान ४ ते ५ ज...

October 23, 2024 8:25 PM

views 61

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवतील, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज वार्ताहर परिष...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.