प्रादेशिक बातम्या

December 8, 2025 10:48 AM

views 58

नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी देवी गडाजवळ मोटार दरीत कोसळून सहा जण ठार

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तशृंगी देवी गडाजवळ मोटार दरीत कोसळून सहा जण ठार झाले आहेत. काल संध्याकाळी हा अपघात घडला. गडाच्या संरक्षक कठड्याची भिंत तोडून ही मोटार सुमारे हजार फूट खाली खोल दरीत कोसळली. अपघातातील सर्व मृत व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावातील रहिवासी आहेत. प...

December 7, 2025 7:22 PM

views 243

नागपुरात उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताह...

December 7, 2025 8:21 PM

views 90

‘राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची, मात्र दिवाळखोरीकडे वाटचाल नाही’

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली, तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकला. त्यांची पत्रकार प...

December 7, 2025 2:59 PM

views 100

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा विधानपरिषदेच्या सभापतींकडून आढावा

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा,पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताहर...

December 6, 2025 8:21 PM

views 166

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. (राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. संसद भवनात आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यां...

December 5, 2025 8:07 PM

views 65

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध-रेल्वेमंत्री

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अर्थसंकल्पात वाढीव तरतूद, प्रकल्पांची जलद अंमलबजावणी, सर्वसमावेशक स्थानकं पुनर्विकास प्रकल्प यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात...

December 5, 2025 7:36 PM

views 88

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीत विसंगती आढळून आल्याने संशयित कुटुंबांची आणि अल्पवयीन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. एकाच कुटुंबातले एकापेक्षा अधिक सदस्य लाभार्थी असणं, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणं असे प्रकार घडल्याने अशा लाभार्थ्य...

December 5, 2025 7:34 PM

views 84

शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कंपनी स्थापन करणार

राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत एक वेगळी वीजकंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेअंतर्गत एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरकृषीपंप लावण्याच्या, र...

December 5, 2025 7:31 PM

views 61

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होईल-SC

राज्यात २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होईल, त्याआधी नाही, असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असून कोणत्याही परिस्थितीत त्या पुढे ढकलल्या जाऊ नयेत...

December 5, 2025 3:34 PM

views 69

‘मागेल त्याला कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.