प्रादेशिक बातम्या

December 9, 2025 3:30 PM

views 51

नोकरी – व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून कायद्यात कडक शिक्षेची तरतूद असेल – मुख्यमंत्री

नोकरी - व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून, केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. याप्र...

December 9, 2025 3:06 PM

views 80

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.   गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आधी २१ डिसेंबर रोजी होणार होती, ती आता ४ जानेवारी रोजी होणार आहे. तर ग...

December 9, 2025 2:51 PM

views 37

डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं सरकारचं ध्येय

डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात सरकारनं कठोर धोरण अवलंबलं असून पुढच्या मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं ध्येय ठेवलं आहे. असा पुनरुच्चार सरकारनं आज केला. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार, राज्यांसोबत काम करत आहे, असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्त...

December 9, 2025 1:33 PM

views 100

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील  आयात कर शून्य करून परदेशातला कापूस आयात केला जात आहे, अशी टीका विरोधकांन...

December 9, 2025 9:48 AM

views 58

विमान वाहतुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही – केंद्रीय विमान वाहतूकमंत्री

विमान वाहतूक ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून त्याच्या सुरक्षेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं केंद्रीय विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल राज्यसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते.   उड्डाणं रद्द का झाली याची चौकशी सरकार करत आहे. सरकारनं हे प्रकरण गांभीर्याने ...

December 9, 2025 9:41 AM

views 215

श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. बाबा आढाव यांचा पार्थिव देह आज सकाळी 10 वाजता अंत्यदर्शनासाठी हमाल भवन इ...

December 8, 2025 3:39 PM

views 48

इंडिगो विमानांच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर  विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आणि डीजीसीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते मुंबईत आज वार्ताहर परिषदेत बोलत हो...

December 8, 2025 6:26 PM

views 229

Winter Session: पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं आज ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.   शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहात आज वंदे मातरमचं सामूहिक गायन झालं. त्यानंतर तालिका अध्यक्षांची नियुक्ती झाली. का...

December 8, 2025 2:51 PM

views 242

महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती

महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागपूर इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.   या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेलाही मंत्रिमंडळानं मजुरी दिली. यामुळे आ...

December 8, 2025 1:25 PM

views 84

एक कोटीचं बक्षीस असलेल्या नक्षली नेत्यासह बारा नक्षलवाद्यांचं छत्तीसगडमधे आत्मसमर्पण

नक्षली संघटनेच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य रामाधर माज्जी याच्यासह बारा नक्षलवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड विभागातल्या नक्षली चळवळीला यामुळे मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. रामाधर माज्जी याच्यावर एक कोटीचं इनाम होतं. एके ४७ रायफलसह रामाधरने पोलिस...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.