प्रादेशिक बातम्या

December 11, 2025 1:28 PM

views 43

राज्यसभेत आज वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या चर्चेचा समारोप

वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्माणाचं आवाहन आहे, असं प्रतिपादन राज्यसभेचे सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी केलं. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चर्चेचा समारोप करताना ते बोलत आहेत. या चर्चेत ८० पेक्षा जास्त खासदारांनी भाग घेतला असून स...

December 10, 2025 8:14 PM

views 117

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य वेळी रुपये देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी  २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले आहेत, अशी माहिती महिला...

December 10, 2025 8:24 PM

views 76

जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे का? – मुंबई उच्च न्यायालय

पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचं नाव एफआयआरमधे न नोंदवता इतर व्यक्तींची चौकशी करत पोलीस पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जा...

December 10, 2025 7:09 PM

views 92

वाहनांच्या ई-चलानच्या यंत्रणेत बदल करणार, लोक अदालतीतून थकीत दंड वसुलीचाही प्रयत्न

वाढती वाहनसंख्या तसंच ई - चलानच्या यंत्रणेत बदल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. ई चलानची वसुली करण्यासाठी लोक अदालत सारखा उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.   राज्यात सर्व...

December 10, 2025 3:36 PM

views 75

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची टोलमाफी येत्या 8 दिवसात लागू करावी- विधानसभा

महाराष्ट्रात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने जाहीर केलेली टोलमाफी येत्या आठ दिवसात लागू करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. याबाबतचा प्रश्न शंकर जगत...

December 10, 2025 3:31 PM

views 85

गडचिरोलीत ११ नक्षली अतिरेक्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली इथं आज ११ जहाल नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर एकंदर ८२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. विभागीय समितीच्या दोन सदस्यांचाही यात समावेश आहे.   यावेळी रश्मी शुक्ला यांनी जहाल नक्षलवादी भूपती याच्या शरणागतीत महत्त्वाची भूमिका बज...

December 9, 2025 7:31 PM

views 82

राज्यात गारठा वाढला!

राज्यात बऱ्याच ठिकाणी गारठा वाढला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली असून आज पारा ५ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सीअसपर्यंत घसरला. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं हुडहुडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आज ५ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरातही प...

December 9, 2025 7:11 PM

views 199

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणाऱ्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. यामुळं सर्व जमीन धारकांची नावं सात बाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.    या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर अस...

December 9, 2025 7:14 PM

views 72

फळपीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. नोंदणी पडताळणी प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सहभाग घेता आला नाही, त्यामुळे याची मुदत वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार रब्बी हंगामातल्...

December 9, 2025 7:21 PM

views 127

अनिल अंबानीच्या २ कंपनी विरोधात सीबीआयकडून FIR दाखल

सुमारे १४ हजार ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनं अनिल धीरुभाई अंबानी उद्योगसमूहातल्या दोन कंपन्यांविरोधात आज  एफआयआर दाखल केले. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत.    युनियन बँकेला २२८ कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणी कंपनीचा ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.