प्रादेशिक बातम्या

March 7, 2025 7:39 PM

views 98

२०२२-२३ वर्षांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर केले. २०२२-२३ या वर्षांसाठी  कोकण विभागातून नवी मुंबईच्या फुलन शिंदे, पुणे विभागातून जनाबाई उगले, नाशिकमधून अहिल्या नगरच्या डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगरच्या मिनाक्ष...

March 7, 2025 7:28 PM

views 39

साहित्य अकादमीच्या भाषांतरासाठीच्या वर्ष २०२४च्या पुरस्कारांची घोषणा

साहित्य अकादमीच्या भाषांतरासाठीच्या वर्ष २०२४च्या पुरस्कारांची घोषणा आज झाली. मराठी विभागातून सुदर्शन आठवले यांना 'द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड' या मूळ इंग्रजी पुस्तकाचं याच नावाने भाषांतर केल्याबद्दल यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मिलिंद म्हामल यांना 'भारतीय तत्वज्ञानाची रूपरेषा' या नावाने 'आऊटलाइ...

March 7, 2025 1:46 PM

views 42

मुंबई अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका फेटाळली

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा याची भारतातल्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळली आहे. भारतात आपलं प्रत्यार्पण केल्यास आपल्यावर अत्याचार केले जातील त्यामुळे हे प्रत्यार्पण रोखावे अशी मागणी त्याने केली होती. प्रधानमंत्री नरें...

March 7, 2025 2:38 PM

views 41

राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक

गेल्या दहा वर्षांतली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात आली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागाने डिसेंबर २०२४ पर्यंतचा परकीय गुंतवणुकीसंदर्भातल्या अहवालात ही माहिती दिली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात...

March 7, 2025 1:26 PM

views 27

अनिल परबांनी माफी मागण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याचा आणि राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत विधान परिषदेत आज सत्ताधारी आक्रमक झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे काम...

March 7, 2025 1:04 PM

views 58

राज्याचा आर्थिक विकास दर ७.३ टक्के राहण्याची शक्यता

चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. कृषी आणि निगडीत क्षेत्र ८ पूर्णांक ७ दशांश, सेवा क्षेत्र ७ पूर्णांक ८ दशांश आणि उद्योग क्षेत्र ४ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांनी वाढण्याची शक्यता राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवा...

March 6, 2025 8:32 PM

views 46

देशातल्या नागरिकांच्या स्थलांतरावर आणि धर्मांतरावर उपराष्ट्रपतींची टीका

देशातल्या नागरिकांच्या स्थलांतरावर आणि धर्मांतरावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी टीका केली आहे. या मुद्द्यांकडे लक्ष दिलं नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात सापडेल असा इशारा त्यांनी दिली.  मुंबईत मुरली देवरा स्मृती संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.    लोकशाहीमध्ये संवाद आवश्यक असल्याची गरज त्यांनी पुन...

March 6, 2025 8:27 PM

views 295

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५ आज विधानसभेत एकमताने मंजूर झालं. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत. राज्यातील ४ हजार ८४९ एकर पडीक जमीन शेतकऱ्यांना मिळणा...

March 6, 2025 8:24 PM

views 36

येत्या ३ महिन्यात राज्याचं अंतराळ धोरण तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

येत्या ३ महिन्यात राज्य सरकार अंतराळ धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं. ठाणे जिल्ह्यात उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं आय़ोजित स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नेंस कॉन्क्लेव्ह मध्ये ते बोलत होते.      गेल्या काही वर्षांत, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर मो...

March 6, 2025 8:24 PM

views 19

जपानमध्ये राज्य सरकार सुरू करणार मराठी ग्रंथालय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भैय्याजी जोशी यांनी मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधीमंडळात गाजला.    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यावर ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.