प्रादेशिक बातम्या

March 5, 2025 7:54 PM

views 35

छत्रपती संभाजी महाराजांना कैद झालेल्या सरदेसाई वाड्यात स्मारक उभारण्याची घोषणा

छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.   रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचा...

March 5, 2025 7:25 PM

views 51

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं आज अविश्वास प्रस्ताव सादर केला. सभापती राम शिंदे यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात आला. शिवसेना पक्ष फुटीपूर्वी त्या उपसभापती झाल्या होत्या. त्यानंतर काही काळ त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. नंतर त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्...

March 5, 2025 3:15 PM

views 17

भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

राज्यातल्या विविध सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. मात्र संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षाच्या स...

March 5, 2025 3:11 PM

views 14

कैलास बोऱ्हाडे युवकाला मारहाण करणाऱ्यांवर मकोका लावण्याचं उपमुख्यमंत्र्याचं आश्वासन

जालना जिल्ह्यात कैलास बोऱ्हाडे या युवकाला मारहाण करणाऱ्यांवर मकोका लावण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिलं. याप्रकरणी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून सर्व गुन्हेगारांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच पालकमंत्री तिथे भेट देतील, असं शिंदे म्हणाले.   राज्यात...

March 5, 2025 3:39 PM

भंडाऱ्यात भुमिगत खाणीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात चिखला इथे भूमिगत खाणीत अपघात होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला खाणीतल्या स्लॅब कोसळून त्याखाली तीन कामगार दबले गेले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाला. जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

March 5, 2025 3:50 PM

views 42

विधानसभेतून समाजवादी पार्टीचे अबु आझमी निलंबित

समाजवादी पार्टीचे आमदार अबु असीम आझमी यांना चालू अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याबद्दल आझमी यांना निलंबित करावं असा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत आझमी यांचं सदस्यत्व विधान...

March 5, 2025 3:50 PM

views 217

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना ठोठावलेल्या दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आज स्थगिती दिली. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार दूर झाली आहे. कोकाटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या तिन्ही हस्तक्षेप याचिकाही न्यायाल...

March 5, 2025 3:47 PM

views 77

प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ

महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.   राज्य सरकारच्या या...

March 5, 2025 9:47 AM

views 51

मध्य रेल्वेचे ११ कर्मचारी सुरक्षा पुरस्काराने सन्मानित

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मिना यांच्या हस्ते काल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.   कल्याण स्थानकात, सिग्नल आणि दूरसंचार विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्य...

March 4, 2025 8:39 PM

views 43

विधीमंडळात दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.