प्रादेशिक बातम्या

March 9, 2025 3:36 PM

views 57

नाटककार प्रशांत दळवी यांना ‘आरती प्रभू’ पुरस्कार जाहीर

नाटककार प्रशांत दळवी यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार कवयित्री नीरजा यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सिंधुदुुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमधील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी संस्थेकडून हा पुरस्कार दिल...

March 9, 2025 3:31 PM

views 59

ई-ऑफिस प्रणालीत अकोला जिल्हा परिषद अव्वल

शासनाच्या ई-ऑफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात अकोला जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. अकोला जिल्हा परिषदेने गेल्या ७ महिन्यांच्या कालावधीत ५१ हजार २३१ 'ई-ऑफिस फाइल्स' तयार केल्या आहेत. गेल्या ऑगस्टपासून अकोला जिल्हा परिषद प्रशासनामार्फत 'ई-ऑफिस' प्रणालीमध्ये कामकाज सुरू करण्यात आलं आहे.

March 9, 2025 3:27 PM

views 64

मुंबईची आर्थिक स्थिती भाजपा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईची आर्थिक स्थिती भाजपा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोप केला आहे. तसचं, गुजरातमध्ये गिफ्ट सिटीसारख्या सुविधा मुंबईला मिळाव्यात, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. मुंबई इथं एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतला कोस्टल रोड, अटल...

March 9, 2025 3:24 PM

views 23

खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवीन खाणपट्टे मंजुरी प्रक्रियेत ‘गती शक्ती’ प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करुन राज्यातले खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या प्रमुख खनिजांच्या ४० खाणपट्ट्यांबाबतची बैठ...

March 9, 2025 6:48 PM

views 44

पतंजली फूड आणि हर्बल पार्कचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पतंजलि अन्न प्रकिया प्रकल्पाचा लाभ छोट्या शेतकऱ्यांना होणार असल्याचं  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरच्या मिहान इथं उभारलेल्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पासाठी...

March 8, 2025 9:02 PM

views 38

जागतिक महिला दिनी आज राज्यात विविध कार्यक्रम

जागतिक महिला दिनी आज राज्यात विविध कार्यक्रम झाले.  पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वानवडी भागात दुचाकी फेरी काढली. या फेरीत २३२ महिला अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्या.  जागतिक महिला दिनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार एका दिवसाकरता महिला पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. पोली...

March 8, 2025 8:50 PM

views 81

जपान टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण

जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज अयोध्येतल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते झालं. भारतात हा पुतळा बनवण्यात आला आहे. आम्ही पुणेकर, इगोदावा इंडिया कल्चरल सेंटर आणि ऑल जपान असोसिएशन यांनी हा पुतळा उभारला आहे.

March 8, 2025 9:04 PM

views 66

देशातलं पहिलं विवाह पूर्व समुपदेशन आणि संवाद केंद्र नाशिकमध्ये सुरू

कौटूंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी देशातलं पहिलं विवाह पूर्व समुपदेशन आणि संवाद केंद्र आज नाशिक मध्ये सुरू झालं. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं. केंद्रीय महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काही दिवसांपूर्वी याची घोषणा केली होती. या केंद्रात येणाऱ्या जोडप्यांना ...

March 8, 2025 8:45 PM

views 45

बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे- राज्यपाल

बचतगटांच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत असून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारंभ  आणि कन्यारत्न  सन्मान कार्यक्रम आज  राजभवन इथं झाला,  त्यावेळी ते...

March 8, 2025 8:43 PM

views 34

बँकिंग क्षेत्रानं सृजनशीलतेचा ध्यास घेत नेतृत्वगुण अंगिकारले पाहिजेत-सीतारामन

जागतिक स्तरावर बदल घडत असताना बँकिंग क्षेत्रानं सृजनशीलतेचा ध्यास घेत नेतृत्वगुण अंगिकारले पाहिजेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या स्थापना दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होत्या. बँकिंग व्यवसायावर कठोर नियंत्रण असलं तरी स्टेट बँकेन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.