प्रादेशिक बातम्या

March 10, 2025 3:43 PM

views 30

AI चा वापर करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा निर्णय

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५० हजार शेतकऱ्यांच्या १ लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय सरकारनं आज जाहीर केला. यासाठी येत्या २ वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची कामे पुढच्या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत पूर्ण केली ...

March 10, 2025 3:53 PM

views 40

आगामी आर्थिक वर्षाचा ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

आगामी आर्थिक वर्षाचा एकूण ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज सादर केला. त्यात ५ लाख ६० हजार ९६४ कोटी रुपयांची महसुली जमा आणि ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे. यात ४५ हजार ८९१ कोटी  रुपये तूट अपेक्षित आहे.    २०२५-२६ ची राजकोषीय तूट १ लाख ३६ हजार २३५ कोटी...

March 10, 2025 5:14 PM

views 18

विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. निवडणुकांसाठी १७ मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येतील, १८ मार्चला अर्जांची छाननी होईल आणि २० मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता वाटल्यास २७ मार्च रोजी मतदान होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी ह...

March 10, 2025 4:01 PM

views 204

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५   महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही - अर्थमंत्री अजित पवार   राज्याचं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करणार असून ४० लाख कोटींची गुंतवणूक तर ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.    नवीन कामगार संहितेनुसार नवे काम...

March 10, 2025 1:17 PM

views 41

कांद्यावरचं २० % निर्यात शुल्क कमी करण्याबद्दल समिती स्थापन करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांद्यावरचं २० टक्के निर्यात शुल्क कमी करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून एक निश्चित धोरण आखू आणि याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. छगन भुजबळ, रोहित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबद्दल प्रश्न उपस्...

March 10, 2025 2:09 PM

views 45

राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होणार

राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून अर्थमंत्री अजित पवार यांचा ११वा अर्थसंकल्प आहे. ते आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत सादर करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ...

March 10, 2025 1:08 PM

views 40

विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत

महाराष्ट्र विधानसभेत आयसीसी चँपियन्स ट्राफी २०२५ मध्ये अजिंक्य पद पटकाविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह संघातल्...

March 10, 2025 9:19 AM

views 24

प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान

पुण्यातील रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांना काल सांगलीमध्ये प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 25 हजार रुपये ...

March 9, 2025 6:24 PM

views 46

माध्यम निरीक्षणाविषयी शासन निर्णयावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

माध्यम निरीक्षणविषयी केलेल्या शासन निर्णयाचा उद्देश टीकेला आळा घालणं किंवा माध्यमांवर देखरेख करणं नसून चुकीच्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर कार्यवाही करणं असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांना अचूक माहिती पुरवणं हे शासनाचं कर्तव्य आहे, चुकीच्या माहितीचं निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभार...

March 9, 2025 6:48 PM

views 38

मुंबईत पाण्याची टाकी साफ करताना ४ कामगारांचा मृत्यू

मुंबईत नागपाडा मिंट रोड इथं आज निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करत असताना ४ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तर एक जण बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पाचही कामगारांना बाहेर काढलं आणि जे जे रुग्णालयात दाखल केलं. यातल्या चार कामगारांचा मृत्यू झाल्याचं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.