प्रादेशिक बातम्या

March 8, 2025 8:31 PM

views 41

Women’s Day: मध्य रेल्वेनं संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेनं आज संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज सकाळी ही वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीच्या दिशेनं रवाना झाली. या गाडीत लोको पायलट, सहायक लोको पायलट, रेल्वेगाडी व्यवस्थापक, तिकीट तपासक, तसंच आहारसेवा प...

March 8, 2025 3:27 PM

views 50

२१ महिला पोलीस अंमलदारांना धुळ्यात कॉप ऑफ द मंथ पुरस्कार

जागतिक महिला दिन राज्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त धुळे जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्‍या २१ महिला पोलीस अंमलदारांना कॉप ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. परभणी जिल्ह्यात दैठणा इथल्या  जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर गोंदियात सायकल स...

March 8, 2025 3:28 PM

views 46

बुलडाणा समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, दहा जण जखमी

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या चारचाकीचं टायर फुटल्यानं ती मागून येणाऱ्या कारला धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्काली...

March 8, 2025 1:54 PM

views 36

जगभरासह देशात आज महिला दिन साजरा

जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार, समान हक्क आणि सबलीकरण ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस महिलांचं योगदान आणि कर्...

March 7, 2025 8:37 PM

views 51

ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते. स्मार्ट मीटर लावणाऱ्या घरगुती ग्राहकांना  दिवसा वापरलेल्या वीजेवर सवलत देणार असल्याची घोषणा मुख...

March 7, 2025 9:03 PM

views 32

महिलांसाठीच्या योजनांची अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर आदिशक्ती समिती स्थापन होणार

राज्य शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव पातळीवर आदिशक्ती समिती या नावाने महिलांची एक विशेष समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा तसेच महिला दिनान...

March 7, 2025 8:05 PM

views 74

हिंगोलीतले संशोधक पुष्यमित्र जोशी यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड

हिंगोली जिल्ह्यातले तरुण संशोधक पुष्यमित्र जोशी यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जोशी यांचं विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरणीय धोरण आणि सामाजिक कार्यातलं योगदान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. १५ ते २९ वर्ष वयोगटात विज्ञान, समाजसेवा, नवोन्मेष, नेतृत्व...

March 7, 2025 8:01 PM

views 45

बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी घेतली राज्यपाल यांची भेट

भारत भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी आज राज्यपाल सी. पी.  राधाकृष्णन यांची मुंबईल्या राजभवनात भेट घेतली. या भेटीत त्यांनी दोन्ही देशातले उद्योग, व्यापार हरित ऊर्जा, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातले संबंध वाढवण्याबाबत चर्चा केली.  या वेळी बेल्जियमचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही उ...

March 7, 2025 8:01 PM

views 41

आकाशवाणीचा वृत्तविभाग उद्याचा महिला दिन अनोख्या रीतीनं साजरा करणार

आकाशवाणीचा वृत्तविभाग उद्याचा जागतिक महिला दिन अनोख्या रीतीनं साजरा करणार आहे. आज मध्यरात्रीपासून पुढचे २४ तास प्रसारित होणारी सर्व हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र महिला वृत्तनिवेदकच सादर करणार  आहेत. वृत्त विभागाचा उद्या दिवसभराचा कारभारही महिला कर्मचारी वर्गच  सांभाळणार असून महिला दिनानिमित्त उद्या रा...

March 7, 2025 7:41 PM

views 53

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती द्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अदानी समूहाला निविदा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सेकलिंक टेक्नोलॉजी या कंपनीने दाखल केली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.