प्रादेशिक बातम्या

April 9, 2025 7:10 PM

views 17

मुंबईत राज्यापालांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिन’ साजरा

मुंबईतही वरळी इथे 'विश्व नवकार महामंत्र दिन'  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. नवकार महामंत्र दिनानिमित्त प्रतिक्रियेपेक्षा चिंतनाला, मतभेदापेक्षा एकतेला आणि संघर्षापेक्षा शांततेला महत्व देण्याचं  आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. ...

April 9, 2025 7:03 PM

views 24

आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातली  आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून  हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं  'मिशन' म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या. मु...

April 9, 2025 8:59 PM

views 40

मुंबईत पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकाचं आयोजन

पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकाचं आयोजन येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान मुंबईत प्रभादेवी इथे केलं जाणार आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण काल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालं. चार दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात विविध विषयांवरचे ए...

April 9, 2025 3:54 PM

views 14

आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं निधन

आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं नुकतंच पवनार आश्रमात निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. कालिंदीताई विनोबांच्या भूदान पदयात्रेत सहभागी झाल्या. कालिंदीताईंच्या दैनंदिनीच्या आधारे लिहिले गेलेलं 'विनोबांची पूर्व पाकिस्तान भूदान-पदयात्रा' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. पवनार आश्रमातू...

April 9, 2025 3:51 PM

views 94

‘आपले सरकार’ पोर्टलसेवा पाच दिवस बंद

राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून उद्यापासून ते १४ एप्रिल पर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरच्या सर्व सेवा आणि प्रणाली उपलब्ध असणार नाहीत.    दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधी...

April 9, 2025 3:26 PM

views 44

शांती, सौहार्दाशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

समाजात शांती आणि सौहार्दपूर्ण वातावरण असल्याशिवाय विकसित राष्ट्र बनण्याचं ध्येय गाठता येणार नाही, असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. उद्या साजऱ्या होणाऱ्या महावीर जयंतीच्या निमित्तानं आज मुंबईत आयोजित 'सर्व धर्मीय संवादाच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि सौहार्द' या विषयावर आयोजित परिसंव...

April 9, 2025 3:23 PM

views 14

वनविभागाच्या महत्त्वाच्या बैठकांचं आज आणि उद्या नागपूरमध्ये आयोजन

वनविभागाच्या महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन आज आणि उद्या नागपूरमध्ये करण्यात आलं आहे. प्रामुख्यानं वाघ आणि मानवी संघर्ष संदर्भात तसंच वाघांच्या मृत्यूबद्दल या बैठकीत चर्चा होणार असून, वन विभागाचं उत्पन्न वाढावं यासाठी वनविकास महामंडळ,जलपर्णी विभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अस...

April 9, 2025 3:16 PM

views 54

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशे वी जयंती ३१ मे रोजी होणार साजरी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशे वी जयंती ३१ मे रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुतळ्याच्या परिसरात अहिल्...

April 9, 2025 3:10 PM

views 39

अमरावती विमानतळावरून पहिलं विमान येत्या १६ एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेने झेपावणार

अमरावती विमानतळाचं काम पूर्ण झालं असून या विमानतळावरून पहिलं विमान येत्या १६ एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. त्याआधी त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधऱ मोहोळ हे विमानतळाचं लोकार्पण करतील तसंच अमरावती ...

April 9, 2025 2:57 PM

views 72

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कालपासून राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सर्व शाळा महविद्यालयांमधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.