प्रादेशिक बातम्या

April 11, 2025 7:37 PM

views 28

राज्यात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातल्या फुले वाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री आणि  पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी फुले वाड्यातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं.    धुळे जिल्हा न्यायालयाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्य...

April 11, 2025 7:28 PM

views 66

Nashik : भ्रष्टाचार प्रकरणी लष्कराच्या १५ अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआय कारवाई

नाशिकच्या तोफखाना केंद्र आणि आर्मी एव्हिएशन सेंटरमधील १५ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.    सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक इथल्या तोफखाना केंद्र...

April 11, 2025 8:32 PM

views 47

वेव्हज परिषद दरवर्षी मुंबईतच होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेव्ह्ज परिषद दर वर्षी भरवण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून तिचं आयोजन मुंबईतच होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह वेव्ह्जच्या तयारीचा त्यांनी आज आढावा घेतला. अशा प्रकारची जगातली सर्वात मोठी प...

April 11, 2025 7:01 PM

views 28

२६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणाच्या तपासामध्ये NIA सहकार्य करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं असून या प्रकरणाचा  पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये राज्य सरकार राष्ट्रीय तपास संस्थेला पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  तहव्वुर राणाला भारतात आणल्याबद्दल मुख्यमंत्र्...

April 11, 2025 3:37 PM

views 58

रोहिना गावातून अंमली पदार्थांच्या साठ्याप्रकरणी २ आरोपींना अटक

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या  रोहिना गावातून ८ एप्रिलला जप्त करण्यात आलेल्या १७ कोटी रुपये किमतीच्या अंमली पदार्थांच्या साठ्याप्रकरणी  २ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे.   रोहिना गावात ...

April 11, 2025 3:35 PM

views 48

भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई

भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत लाखनी पोलिसांनी दोन विनाक्रमांक ट्रॅक्टर आणि ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या गस्ती पथकानं यापैकी एक ट्रॅक्टर मुंडीपार सडक शिवारात तर दुसरा लाखनी परिसरात जप्त केला. 

April 11, 2025 3:34 PM

views 17

प्रसिद्ध उद्योगपती मधुर बजाज यांचं निधन

प्रसिद्ध उद्योगपती मधुर बजाज यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. गेले काही दिवस मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. देशातल्या अग्रणी दुचाकी वाहन उद्योग बजाज ऑटोचे ते मानद संचालक होते.   त्याखेरीज  महाराष्ट्र स्कूटर लिमिटेड चे अध्यक्ष होते. बजाज उद्योगस...

April 11, 2025 3:31 PM

views 41

एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारला

एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पदभार स्वीकारला. ही जबाबदारी दिल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.   सार्वजनिक सेवेत काम करताना जनतेचा विश्वास हीच खरी ताकद मानून पुढे जाण्याचा नेहमीच प्...

April 11, 2025 3:28 PM

views 18

एसटी कर्मचाऱ्यांचा ४४ % पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार

एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचं फक्त ५६ टक्के वेतन मिळाल्याचं वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमधे याबाबत नाराजी होती.   उपमुख्यमं...

April 10, 2025 6:49 PM

views 19

मुंबईत वडाळा इथं पोषण पंधरवडा कार्यक्रमांचं आयोजन

मुंबईतल्या वडाळा इथं पोषण पंधरवडा कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं. आरंभिक बाल संगोपन आणि बालशिक्षण दिवसाच्या अनुषंगानं ०३ ते ०६ वर्षाचं मुल असणाऱ्यांना अंगणवाडी सेविकांनी  पोषणाचं महत्त्व समजावून सांगितलं. अंगणवाडी सेविकांनी पोषण अभियानमुळं अंगणवाडीत झालेला बदल आणि पालकांचा बदलता दृष्टिकोनाविषयी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.