प्रादेशिक बातम्या

April 10, 2025 7:12 PM

views 171

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.   पालघरमध्ये लवक...

April 10, 2025 7:01 PM

views 35

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.    मुंबईत महावीर जयंती निमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे 'महावीर स्वामी जन्म कल्याणक' या महोत्सव आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपस्थित होेते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भारत जैन महामंड...

April 10, 2025 3:29 PM

views 41

पालघर जिल्ह्यातील सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राला एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यात सर्वाधिक प्रसूती सेवा पुरविल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसंच पालघर जिल्ह्यानं राज्यात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल द्वितीय क्रमांकाचा सन्...

April 9, 2025 8:43 PM

views 50

मुंबईकर सावधान ! पावसाळ्यात धोक्याची घंटा

यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्राला मोठी भरती येणार आहे, त्यामुळे मुंबईसाठी यंदाच्या पावसाळ्यातले १८ दिवस धोक्याचे आहेत, असा इशारा महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिला आहे.  या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. या दिवसांत पर्यटकांनी किनाऱ्या...

April 9, 2025 8:47 PM

views 42

शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी अटक प्रशांत कोरटकरला जामीन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवांचा अवमान केल्याप्रकरणी अटक असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली आहे. न्यायाधीश डी व्ही कश्यप यांच्यासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. १२ एप्रिल रोजी कोरटकरच्या...

April 9, 2025 7:46 PM

views 53

पुण्यातल्या ८६० रुग्णालयांची तपासणी

आरोग्य विभागानं दिलेल्या आदेशानुसार पुणे  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील 860 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का, रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक, मोफत क्रमांक लावले आहे का याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये  त्रुटी आढळलेल्या 89 रुग्णालयांना...

April 9, 2025 7:28 PM

views 51

लातूरमध्ये १७ कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थ नियंत्रण पथकानं लातूर जिल्ह्यात १७ कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. हे पथक गेल्या दोन दिवसांपासून अमली पदार्थ निर्मितीचं ठिकाण शोधत होतं. रोहिना गावात हे अमली पदार्थ तयार केले जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रक पथकानं पाच ...

April 9, 2025 7:25 PM

views 60

रत्नागिरीत टँकरनं पाणीपुरवठा

रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवू लागल्यानं जिल्ह्यात सर्वप्रथम रत्नागिरी तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या २५ वाड्यांना टँकरनं पाणी पुरवलं जात आहे. चिपळूण तालुक्यातल्या १४ गावांनी तर राजापूर आणि मंडणगड तालुक्यातल्या प्रत्येकी दोन गावांनी टँकरची मागणी केली आहे. रत्ना...

April 9, 2025 7:22 PM

views 88

देवरहाटी जमिनींवरच्या विकासकामांसाठी अहवाल सादर करण्याचे महसूल राज्यमंत्र्यांचे आदेश

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवरहाटी जमिनींवरच्या विकासकामांसाठी येत्या १५ दिवसांत महसूल आणि वन विभागाने अहवाल सादर करावेत, असे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज दिले. कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. देवरहाटी जमिनीच्या विकासाचा प्रश्न स...

April 9, 2025 7:11 PM

views 51

ठाण्यात भातसा नदीत बुडून तीघांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात भातसा नदीत बुडून आज ३ जणांचा मृत्यू झाला. गोठेघर वाफे इथली महिला आपला मुलगा आणि भाचीसमवेत नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असताना ही दुर्घटना झाली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.