प्रादेशिक बातम्या

April 9, 2025 10:38 AM

views 44

एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक धोरणांतर्गत महाराष्ट्र आणि विदर्भ ग्रामीण बँकेचं एकत्रीकरण

एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार ४३ प्रादेशिक बँकांच्या एकत्रिकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँकेत विलीन केली जाईल. १ मे पासून हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल. या एकत्रित बँकेचं मुख...

April 9, 2025 10:35 AM

views 27

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात नवीन तंत्रज्ञानानं अद्ययावत केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिं...

April 9, 2025 10:33 AM

views 21

पुणे विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही येणार वेग

पुणे विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही वेग येणार आहे. हे काम जलद गतीनं करण्याचे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल झालेल्या बैठकीत दिले. विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारं भूसंपादन, लोहगावचा पर्यायी रस्ता आणि इत...

April 9, 2025 10:30 AM

views 36

जळगाव मधल्या नव्या वसतीगृहांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश

जळगाव मधल्या नव्या वसतीगृहांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल दिले. ते काल जळगाव मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत आठवले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्र...

April 9, 2025 10:23 AM

views 82

राज्यात येत्या २-४ दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या बहुतांश भागात सध्या तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. अकोला इथं काल राज्यातील सर्वात जास्त 44 पूर्णांक 2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात येत्या 2-4 दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  

April 9, 2025 10:04 AM

views 97

अंबाजोगाई इथलं प्राचीन सकलेश्वर अर्थात बाराखांबी मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित

महाराष्ट्र शासनानं अंबाजोगाई इथलं ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर अर्थात बाराखांबी मंदिर, हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. या निर्णयामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणासह पर्यटनालाही चालना मिळणार आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबत ...

April 9, 2025 10:02 AM

views 40

पंढरपूरात चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा

पंढरपूर इथं चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा काल साजरा झाला. सुमारे तीन लाखांहून जास्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. दरम्यान, पंढरपूर इथं भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय-तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, याबाबतची चाचणी का...

April 9, 2025 9:58 AM

views 50

परभणी इथं शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतला आढावा

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल परभणी इथं शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत आदर्श शाळा, निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेली वृद्धी, सीएम श्री शाळाबाबत माहिती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी,...

April 9, 2025 9:55 AM

views 48

नांदेड – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं फरोग मुकदम यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन काल जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांच्या हस्ते झालं. येत्या १४ तारखेपर्यंत चालणार्या या सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचं काम सर्वांनी प्राधान्यानं करावं, अ...

April 9, 2025 10:42 AM

views 47

छत्रपती संभाजीनगरसह महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनींचं प्राधिकरणाकडे हस्तांतरण

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनी, संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयामुळे विकास कामांना वेग येण्याची अपेक्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.