राष्ट्रीय

December 8, 2024 8:16 PM

views 28

भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. हरयाणात कुरुक्षेत्र इथं गीता ज्ञान संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीतामहोत्सवाला ते संबोधित करत होते. गेल्या १० वर्षात भारताने अभूतपूर्व प्रगती केली असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...

December 8, 2024 7:14 PM

views 115

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प संगमनेर मार्गावरच होणार

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्याच प्रस्तावित संगमनेर मार्गावरच होणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. हा प्रलंबित प्रकल्प प्रस्तावित संगमनेर मार्गावरच व्हावा या मागणीसाठी  खासदार राजाभाऊ वाजे यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत अश्विनी वैष्णव य...

December 8, 2024 3:44 PM

views 34

देशाच्या सीमा संरक्षणाला मजबुती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

सीमा सुरक्षादल गेली ६ दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबुती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आ...

December 8, 2024 2:36 PM

views 44

चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ

बहुप्रतिक्षित चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड इथे, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यात उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात धामी यांनी यात्रेला सुरुवात झाल्याची घोषणा केली. चारधाम यात्रेकरूंना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले....

December 8, 2024 2:22 PM

views 19

भारतीय वायू दलाच्या पश्चिम कमांडच्या कंमांडरांचं दोन दिवसांचं संमेलन दिल्लीत संपन्न

भारतीय वायू दलाच्या पश्चिम कंमांडच्या कंमांडरांचं दोन दिवसांचं संमेलन काल दिल्लीत संपन्न झालं. या संमेलनात वायू दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी युद्ध आणि बहुक्षेत्रीय युद्धकौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता याबाबत उपस्थितांशी चर्चा केली. सिंह यांनी संमेलनाच्या यावर्षीच्या ‘भारत...

December 8, 2024 2:13 PM

views 20

युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसने वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात मिळवलं यश

आयआयएम आणि आयआरबीनं केलेल्या एका अभ्यासानुसार भारताच्या युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसनं वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात यश मिळवलं आहे. युपीआयनं आर्थिक दृष्ट्या दुर्बल समूहांना प्रथमच औपचारिक कर्ज मिळवण्यासाठी सक्षम बनवल्याचंही या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. युपीआयमुळे मिळ...

December 8, 2024 3:14 PM

views 59

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा केला पुरवठा

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केल्याची माहिती, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. भारताच्या अॅक्ट ईस्ट आणि नेबरहूड फर्स्ट या धोरणांतर्गत भारत मानवतावादी मदत करत आहे, असं जयस्वाल म्हणाले.

December 8, 2024 1:42 PM

views 46

क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशाच्या टीबी विरोधातल्या लढ्यात, अधिक रुग्णसंख्या असलेल्या टीबी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून १०० दिवसांच्या विशेष मोहीमेमुळे देश बळकट झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरील एका संदेशात मोदी यांनी सांगितलं की, रुग्णांना दुप्पट मदत, जन भागिदारी, नवीन औषधं, तंत्रज...

December 8, 2024 1:34 PM

views 30

अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नाही – परराष्ट्र व्यवहार मंत्री

अमेरिकेच्या डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन चलन सुरु करण्याचा ब्रिक्स देशांचा कोणताही विचार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. ते कतरच्या राजधानीत आयोजित दोहा फोरममध्ये बोलत होते. अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या मुद्द...

December 8, 2024 10:36 AM

views 32

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये श्वानपथकाचाही समावेश असेल. यावेळ...