राष्ट्रीय

June 27, 2025 3:54 PM

views 53

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय MSME दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. MSME क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या...

June 27, 2025 3:52 PM

views 92

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळण्यासाठी पुणे इथं कापूस, हळद आणि मका पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पुणे इथं कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी भविष्यात त्यांच्...

June 27, 2025 3:45 PM

views 12

२०२६ च्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा, राज्यात ऊसाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढणार

सन २०२६च्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन १५ टक्क्यानं वाढून साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे. जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात, ...

June 27, 2025 2:10 PM

views 16

कर्नाटकमधे चामराजनगर जिल्ह्यातल्या मलय महादेश्वर अभयारण्यात एक वाघीण आणि तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले

कर्नाटकमधे चामराजनगर जिल्ह्यातल्या मलय महादेश्वर अभयारण्यात एक वाघीण आणि तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले आहेत. वाघांना मारण्यासाठी आमिष म्हणून गायीच्या मृतदेहात विष मिसळण्यात आलं असावं, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्नाटक ५६० ...

June 27, 2025 2:06 PM

views 67

भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि चीन दरम्यान २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांत पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमच भर दिल्याचं राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यां...

June 27, 2025 2:03 PM

views 41

ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला पुरी इथं सुरुवात

ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंडं बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला आज सकाळी पुरी शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यासाठी जगभरातील हजारो भक्त पुरीमध्ये जमले आहेत. ही रथयात्रा तिन्ही देवतांना श्री गुंदीचा मंदिराकडे नऊ दिवसांसाठी घेऊन जाते. यात्रेच्या वेळापत्रकानुसा...

June 27, 2025 1:59 PM

views 59

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यतेखाली बैठक पार

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यतेखाली आज बैठक झाली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी...

June 27, 2025 1:57 PM

views 78

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिक मायदेशी परतले

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचलं. आतापर्यंत १९ विशेष उड्डाणांद्वारे एकूण ४ हजार ४१५ भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली....

June 27, 2025 11:16 AM

views 56

दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील-मंत्री नितीन गडकरी

दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. दुचाकींवर पथकर लादण्यात येणार असल्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून काही प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात प्रसारित केलेलं वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं.  

June 27, 2025 11:15 AM

views 60

प्रधानमंत्र्यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे देशातलं उत्पादन वाढलं आहे-राज्यमंत्री व्ही.सोमन्ना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे, देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली असून, मेक इन इंडिया उपक्रमामुळं देशात उत्पादन वाढलं आहे, असं प्रतिपादन रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही.सोमन्ना यांनी काल चेन्नईतील पेरांबूर इथं इंटिग्रल कोच फॅक्टरीम...