मिश्र

January 23, 2025 2:43 PM

views 329

हिमाचल प्रदेशात थंडीची लाट

जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद तसंच हिमाचल प्रदेशात उद्यापर्यत थंडीची लाट राहील असा भारतीय हवामानशास्त्रविभागाचा अंदाज आहे. झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामधे रात्री आणि पहाटे दाट धुकं राहीलपश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार आणि ओदिशातही धुक्याचं आच्छाद...

January 22, 2025 3:22 PM

views 21

ठाण्यात ५ कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त

ठाणे पोलिसांनी काल ५ कोटी रुपये किंमतीचं ५ किलो अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी जप्त केली. या प्रकरणी पुण्याजवळ दीघी इथून एकाला अटक करण्यात आली आहे. ८० लाख रुपयांची अंबरग्रीस घेऊन एक जण ठाण्यातल्या साकेत मध्ये येणार असल्याची खबर मिळाल्यावरुन ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकानं ही कारवाई केली. आरोपी...

January 22, 2025 3:39 PM

views 43

नाशिक इथल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक इथल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देवस्थान पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेनं यासाठी नियोजन केलं आहे. या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं दिंड्या येत आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पौषवारी उद्यापासून ते २७ जानेवार...

January 22, 2025 2:01 PM

views 21

देशातल्या काही राज्यात तुरळक ठिकाणी उद्या पहाटेपर्यंत राहील दाट धुकं

बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यात तुरळक ठिकाणी आज रात्रीपासून ते उद्या पहाटेपर्यंत दाट धुकं राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दिल्लीतही दाट धुकं पसरलं असून त्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. हिमाचल प्...

January 22, 2025 1:58 PM

views 45

अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कुटुंब एका लग्नसोहळ्यावरून घरी परतत असतानाच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

January 22, 2025 2:13 PM

views 24

बॅडमिंटन: पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन आज इंडोनेशिया मास्टर्स सुपर-500 मध्ये आपापले सामने खेळतील

जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल. पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जला कोरियाच्या जिओन ह्योक-जि...

January 22, 2025 1:47 PM

views 39

राष्ट्रीय शेअर बाजारातल्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ११ कोटींहून जास्त

राष्ट्रीय शेअर बाजारातल्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या नोंदणीत ३ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकी वाढ झाली आहे. १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना झाल्यापासून पुढची १४ वर्षं १ कोटी इतके गुंतवणूकदार होते. त्यानंतर मात्र हा वेग वाढला. गेल्या पाच...

January 22, 2025 9:53 AM

views 25

दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रतिलिटर पाच रुपये अनुदान

राज्यातल्या सहकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपये अनुदान जमा झालं आहे.

January 19, 2025 1:48 PM

views 35

हमासबरोबरची युद्धबंदी लांबणीवर टाकल्याची इसराएलची घोषणा

इस्रायलनं हमासबरोबरची गाझामधली युद्धबंदी लांबणीवर टाकली आहे. मुक्तता करायचं ठरवलेल्या पहिल्या ओलीसांची यादी जोवर हमासकडून प्राप्त होत नाही तोवर युद्धविराम अंमलात येणार नाही, असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं.   भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता लागू होणार असलेला ...

January 17, 2025 1:44 PM

views 20

छत्तीसगढमध्ये 12 नक्षलवादी ठार

  छत्तीसगडमध्ये काल माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीच्या ठिकाणावरून सुरक्षादलानं १२ माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यातल्या पामेड आणि बासागुडा विभागात काल ही चकमक झाली होती.   हे नक्षलवादी पीएलजी बटालियन नंबर वन आणि सेंट्रल रिजनल कमीटीचे सदस्य असल्याचं पोलिसां...